logo

आमच्या विषयी

विटा शहरात तुमचे स्वागत आहे...

महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यांतील खानापूर तालुक्यातील विटा हे प्रमुख शहर आहे. सदर शहराची लोकसंख्या ४८,२८९ इतकी आहे . विटा शहर हे सांगली जिल्हा मुख्यालयापासून ५५ किमी उत्तरेस आहे. सातारा शहराच्या आग्नेयेस सुमारे ७५ किमी अंतरावर आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या नगराला महत्त्व आहे. छत्रपतींच्या प्रतिनिधीचे वास्तव्य येथे होते. त्र्यंबक कृष्ण यांनी एक वाडा येथे बांधला.

इतिहास

सांगली जिल्ह्यातील विटा हे शहर पुरातन कालीन आहे. शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी राणी सकवारबाई(गायकवाड घराणे)येथे वास्तव्यास होत्या. विटा शहरात काही मंदीरे जुनी आहेत त्यापैकी जुन्या गणपती मंदीरा मागे हेमाडपंथी शिव मंदीर आहे दसरा या सणाला येथे भव्य नेत्रदीपक असा ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा भरतो या शहराला सुवर्ण नगरी अस ही म्हणतात. हे शहर शांतताप्रिय आहे, हे महाराष्ट्रातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती पुतळे समोरासमोर आहेत.
विटा येथे अभियांत्रिकी महाविद्यालय , फार्मसी महाविद्यालय, डि.एड,बी.एड महाविद्यालय आणि शास्त्र, कला आणि वाणिज्य महाविद्यालये आहेत. येथे मराठी, इंग्लिश आणि उर्दू भाषांमधून प्राथमिक माध्यमिक, ऊच्चमाध्यमिक शिक्षण उपलब्ध आहे.

विटा नगारपरिषदचे माननीय सदस्य

team Image

डॉ. विक्रम बांदल

प्रशासक

डॉ. विक्रम बांदल

प्रशासक

team Image

श्री.विक्रमसिंह पाटील

मुख्याधिकारी

श्री. विक्रमसिंह पाटील

मुख्याधिकारी

team Image

श्री.स्वप्निल खामकर

उप मुख्याधिकारी

श्री.स्वप्निल खामकर

उप मुख्याधिकारी

स्वच्छ सर्वेक्षणमधील कामगिरी

विटा नगरपरिषद ही - ब वर्ग नगरपरिषद असून स्वंच्छO सर्वेक्षण 2021 मध्येळ संपूर्ण देशात 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्येरच्याF गटामध्येग सर्वांत स्वंच्छO शहर म्हाणून प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळाले आहे. तसेच स्वंच्छय सर्वेक्षण 2021 मध्येव 3 स्टा्र म्हनणून तारांकित मानांकन व ODF+ + हागणदारीमुक्त शहर मानांकन प्राप्त् झाले आहे. या पारितोषिकाचे वितरण 23 नोव्हेंनबर 2021 रोजी भारताचे महामहिम राष्ट्रवपती मा.श्री.रामनाथ कोवींदजी यांचे हस्ते विज्ञान भवन, दिल्लीा या ठिकाणी करणेत आले.

25

देशात स्वच्छ सर्वेक्षण 2018

14

राज्यात स्वच्छ सर्वेक्षण 2018

1

2020 :बेस्ट इनोव्हेाशन अँण्ड प्रॅक्टींसेस

1

2019 पश्चिम भारतात सर्वात स्वच्छ‍ शहर

3

स्वच्छ सर्वेक्षण 2019: स्टार तारांकित मानांकन व ODF+ मानांकन

3

2020 :बेस्ट इनोव्हेाशन अँण्ड प्रॅक्टींसेस व ODF+ + मानांकन

विटा शहराविषयी...

महत्वाचे मुद्दे

विटा शहराची

शैक्षणिक पार्श्वभूमी

1913 मध्ये मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली. कालांतराने त्या शाळेला कन्या शाळा क्रमांक 3 असे नाव देण्यात आले. शाळा नंबर 1 मध्ये मुलांच्या संख्येत चांगली वाढ झाल्यामुळे शाळा नंबर २ अशी स्वतंत्र शाळा १९४४ पासून सुरु करण्यात आली. . मुस्लिम समाजाला मातृभाषेतून शिक्षण मिळवण्यासाठी 1930 मध्ये उर्दू शाळा स्थापन करण्यात आली. आजरोजी नगरपरिषदेच्या एकूण 19 शाळा सुरु आहेत.

वैद्यकीय सेवा

विटा आणि खानापूर परिसरात टप्प्याटप्प्याने वैद्यकीय सेवा विकसित होत गेली. सुरुवात ब्रिटिश राजवटीत झाली. नंतर नगरपालिकेच्या सहाय्याने वैद्यकीय सुविधा सुरू झाल्या. शासकीय आरोग्य सेवा लोकल बोर्ड व नंतर जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाले.

प्रशासकीय कार्यालय

विटा शहरातील विविध शासकीय कार्यालये नागरिकांच्या सोईकरिता व प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्याच्या दृष्टिकोनातून एकाच इमारतीत आणून एक सुसज्ज अशी भव्य इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीत खालीलप्रमाणे कार्यालये आहेत

विटा पोलिस ठाणे

विटा शहरातील मध्यवर्ती भागात प्रशासकीय इमारती शेजारी विटा पोलीस ठाणेची प्रशस्त इमारत आहे. या इमारतीच्या आवारात पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना राहाणेसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.

रेवणसिद्ध मंदिर

नवनाथ संप्रदायाची सुरुवात आठव्या-नवव्या शतकात मच्छिंद्रनाथ यांनी केला. नाथ संप्रदायात चमसनारायणाचा अवतार म्हणून रेवनाथाचा उल्लेख आहे.

प्रशंसापत्र